! मराठी सांस्कृतिक विवाहातील विधी !

लग्नाचा दिवस हा वधू आणि वराच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो !! नवीन आयुष्याची  सुरवात आपल्या जोडीदारचा हात धरून आपल्या आई वडीलांच्या आशीर्वाद घेऊन काही विधीसोबत होते  

  • लग्नातल्या विधिचा क्रम*-

गणपतीची पूजा, देवदेवक- विघ्नहार्ताच्या पूजेने लग्नाचा दिवस सुरु होतो , नवीन जोडीच्या उज्वल भविष्यासाठी गणपती चे पूजन केले जाते.

अंतरपाट-

जेव्हा वधू आणि वर मंडपामध्ये समोरासमोर बसतात तेव्हा एकमेकांचा चेहेरा त्यांना दिसू नये म्हणून अंतरपाट (पडदा) टांगला जातो.

संकल्प-

या विधी दरम्यान वधू मंडपामध्ये प्रवेश करते,  गुरुजी/ भटजी मंगलाष्टके म्हणायला सुरवात करतात, प्रत्येक मंगलाष्टकांची सांगता नेहमी

तदेव लग्नं सुदिनं तदेव

ताराबलं चंद्रबलं तदेव

विद्याबलं दैवबलं तदेव

लक्ष्मीपते तें घ्रीयुगं स्मरामी ||

या श्लोकाने होते , याचा अर्थ आजचा दिवस, चंद्रतारे व ग्रहमान चांगले आहे तसेच विद्या व दैव ही उत्तम आहे मात्र जर काही चांगले नसेल तर लक्ष्मीपती (विष्णु) तुमच्या स्मरणाने ही उणीव भरून निघो   या नंतर अंतरपाट कडून टाकला जातो आणि शेवटी वधू आणि वरचा चेहेरा एकमेकांना दिसतो !

कन्यादान-

लग्नाची सर्वात महत्त्वाची विधी आणि भावनिक क्षण म्हणजे कन्या दान, वधूचे वडील आपल्या मुलीला पुढील वाटचालीसाठी आणि सुखी आयुष्या साठी  आशीर्वाद देतात, या विधी मध्ये वर वधू ला मंगळसूत्र बांधून तिच्या कपाळावर कुंकू लावतो

सप्तपदी-

या विधीमध्ये परंपरेनुसार वधू आणि वराने मंडपामध्ये पवित्र अग्नीभोवती सात फेरी घ्याव्या लागतात प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यानंतर, वधू सात सुपारीस स्पर्श करते. नवविवाहित जोडप्याने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना साथ देण्याचे व्रत केले आहे.
कर्मसामाप्ती-

या विधीमध्ये विवाह जोडपं लक्ष्मीपूजन करतात. वर वधूला नवीन नाव देते. आपल्या बहिणीवरील कर्तव्याची आठवण करुन देण्यासाठी वधूचा भाऊ नवऱ्या मुलाचा कान पिळतो आणि माझ्या बहिणीला सुखी ठेव असा सांगतो . शेवटी, वधू व वर जोडीने तेथे उपस्थित असलेल्या सर्वांचा आशीर्वाद घेतात

अश्यारितीने सर्व विधी समाप्त होऊन लग्न झालेल्या जोडीची नवीन आयुष्याची सुरवात होते !!

  30th July, 2019